BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकरूड येथे डायलेसीस सुविधा सुरु

 


शिराळा: रुग्णांना डायलेसीसचा होणारा त्रास डोळ्याने पाहिला आहे. तुला कधी शक्य झाले तर गरिब रुग्णांसाठी कोकरूड येथे डायलेसेस मशीन सुरू कर असे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी मला सांगितले होते.आज मी त्यांचे  स्वप्न पूर्ण करू शकलो याचा आनंद असल्याचे  प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. 

कोकरूड (ता.शिराळा) येथे ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या पाच डायलेसेस मशीनच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते.यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. विक्रम कदम,माजी सभापती हणमंत पाटील ,सुखदेव पाटील, बाळासाहेब पाटील, पृथ्वीसिंह नाईक,केदार नलवडे, डॉ. दिपाली खरात, डॉ. जगदीश होनमाने यांची प्रमुख  उपस्थिती होती.

 यावेळी आमदार देशमुख म्हणाले, कोकरूड ग्रामीण रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील लोकांची चांगली सोय होत आहे. वैद्यकीय सुविधा चांगली मिळत असल्याने रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले होते की, डायलेसेस प्रचंड खर्चिक बाब आहे. ग्रामीण भागात मोफत सेवा होणे अत्यावश्यक असून तुला शक्य झाले तर कोकरूड येथे डायलेसेस सेवा सुरू कर .आज मला निश्चित अभिमान आहे.त्यांचे  स्वप्न पूर्णत्वास आणू शकलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागासाठी सोयी  उपलब्ध करून दिल्या आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार मिळत आहेत .हे सरकार  संवेदनशील सरकार असून मतदारसंघातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे नाव देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत आहे.

     यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, आरोग्य सुविधा ही अत्यंत महत्त्वाची बाब असून आरोग्य सुविधा बाबत जागृती महत्त्वाची आहे.आरोग्य सुविधा बाबत सरकारने अनेक महत्त्वकांक्षी योजना राबवून गरीब कुटुंबाला आधार देण्याचे काम केले आहे. डोंगरी विभाग योजनेचा जन्म स्वर्गीय देशमुख यांनी घातला. त्यांच्या  यांच्या निधनानंतर वैचारिक राजकारणाला खंड पडला होता तो आता आमदार सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाला आहे याचा निश्चित अभिमान आहे. 

 सम्राट महाडिक म्हणाले, लोकांची अडचण लक्षात घेऊन आरोग्य सेवेबाबत शासनाने योजना सुरू केल्या आहेत. खाजगी हॉस्पिटल कडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने एक धोरणात्मक निर्णय घेऊन गरीब कुटुंबांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे .

  यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील,बाजीराव शेडगे,हिंदुराव नांगरे, सुजित देशमुख,ए.सी पाटील ,श्रीरंग नागरे,बाजीराव पाटील ,मोहन पाटील,अंकुश नांगरे,सूर्यकांत शिंदे ,शामराव पाटील,राहुल पाटील,शंकर पाटील,नथुराम सावंत,डॉ. कालेकर, डॉ. बनसोडे उपस्थित होते.


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



Post a Comment

0 Comments